Schedule : Monday - Saturday : 10 AM to 8 PM IST | Online Consultation
गॅजेट्सचा अतिवापर ठरतोय त्वचेला हानीकारक
मोठ्यापांसून लहान मुलांपर्यंत सारेजण गॅझेट्सच्या आहारी जातात.
मुंबई : सध्या इलेक्ट्रोनिक गॅजेट्स हे जणू आयुष्याचाच अविभाज्य भाग असल्यासारखे आपण सर्वजण वागत असतो. संपर्क साधण्यापासून ते मनोरंजनापर्यंत या गॅजेट्सवर प्रत्येक जण अवलंबून असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळतं. पण कधी विचार केला आहे का की, या गॅजेट्सचे जितके फायदे आहेत त्याहून अधिक तोटे देखील आहेत. त्यांच्या अतिवापरामुळे तरुण वयातच अनेकांना कानांचे, डोळय़ांचे, त्वचेचे अनेक आजार झालेले त्यामुळे पाहायला मिळतात. मोठय़ांपासून ते लहान मुलांपर्यंत सारेच जण याच्या आहारी जात असल्याचे 'द एस्थेटिक क्लिनिक्स'च्या सल्लागार आणि डरमॅटो सर्जन डॉ. रिंकी कपूर यांनी सांगितले.
काही व्यक्तींना टिव्ही, मोबाईल किंवा कॉम्प्यूटरच्या स्क्रीनकडे पाहताना सतत डोळे बारीक करून पाहण्याची सवय असते. त्यामुळे डोळ्यांच्या अवतीभोवती सुरकुत्या पडू लागतात, तसेच डोळ्यांवरही सतत ताण जाणवू लागतो. त्यामुळे स्क्रीनकडे बघताना डोळे बारीक करून बघणे टाळावे. कॉम्प्युटर किंवा मोबाईल आपल्या शरीराच्या खूप जवळ ठेवणे हे टाळावे. या गॅजेट्स मधून बाहेर पडणारे रेडियोमॅग्नेटिक किरण आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. तसेच कॉम्प्युटर किंवा मोबाईल स्क्रीन मधील अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे त्वचा आणि डोळे या दोहोंना अपाय होऊ शकतो.
स्मार्ट फोन आणि लॅपटॉपकडे सतत खाली मान घालून पाहिल्याने हनुवटी आणि गळ्याभोवती कायमच्या सुरकुत्या येऊ शकतात. आजकाल तरुणामंमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात पहायला मिळते. लेसर आणि फिलर सारख्या महागडे उपचार वगळता यावर इतर उपचार होत नाहीत.
मोबाईल फोनच्या माध्यमातून मोठ्या जंतूचा प्रसार होतो टॉयलेटच्या सीटपेक्षाही फोनवर जास्त बॅक्टेरिया असतात. फोन स्क्रीन जितका अधिक काळ आपल्या चेह-याच्या त्वचेशी संपर्कात येते तितक्या अधिक प्रमाणात मुरुम आणि डाग येण्याची शक्यता अधिक असते. फोनवर चिकटलेला घाम आणि जंतूमुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात.
प्रत्येकजण आता गॅजेट्स वापर करणे तर थांबवू शकत नाही पण त्यापसून आपल्या त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी आपण घरच्या घरी काही प्रतिबंधात्मक गोष्टींचे पालन जरूर करू शकतो. याकरिता खाली दिलेल्या उपायांचा अवलंब करावा.
फोनवर दीर्घकाळ संभाषण होत असल्यास स्पीकर बटण किंवा चांगल्या प्रतीचे इयरफोन्सचा वापर करा.
खाली मान घालून आपला फोन,लॅपटॉप न पाहता तो डोळ्यांसमोर ठेवून पहा.
रात्री उशिरापर्यंत टीव्ही,मोबाईल फोन, संगणकाचा वापर करणे टाळा. आपल्या डोळ्यांना आणि त्वचेलाही विश्रांती गरज असते.
झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापर करणे टाळा.
मोबाईल फोन झोपण्याच्या जागेच्या दूर ठेवा.
स्क्रीनची टाईम मर्यादित करा
त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्याकरिता घरगुती उपचार
बदाम रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी त्याची पेस्ट तयार करा आणि ती डोळ्यांभोवती लावा. हे डोळ्यांभोवती असलेले काळे वर्तुळ दूर करण्यास फायदेशीर ठरेल.
सतत मोबईल, लॅपटॉप व इतर इलेक्ट्रोनिक गॅजेट्सचा वापर करणा-या व्यक्तींनी दर वीस मिनिटांनी विश्रांती घेत २० सेकंदासाठी स्क्रीनव्यतिरिक्त दूरवर नजर फिरवा.
डोळ्यांचा थंडावा मिळण्यासाठी काकडी किंवा कोल्ड स्पुनचा वापर करा.
झेंडूची फुले ही दह्यात मिक्स करून चेह-याला लावणे फायदेशीर ठरेल
कडुनिंब, तुळस आणि हळद यांचे मिश्रण एकत्र करून त्याचा फेस पॅक आठवड्यातून तिनदा चेह-याला लावा.
संतुलित आहाराचे सेवन करा. रोजच्या आहारात फळं आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.
Article Source - https://zeenews.india.com/marathi/technology/excessive-use-of-gadgets-is-harmful-to-the-skin/521775
Dr. Debraj Shome is Director and Co founder of The Esthetic Clinics. He has been rated amongst the top surgeons in India by multiple agencies. The Esthetic Clinics patients include many international and national celebrities who prefer to opt for facial cosmetic surgery and facial plastic surgery in Mumbai because The Esthetic Clinics has its headquarters there.